आष्टी प्रतिनिधी l आज मराठी वृत्तसेवा
आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन आष्टी शहरातील संपर्क कार्यालयासमोर ध्वजारोहण केले आणि मानवंदना दिली.आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद
द्यावा असे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.
यावेळी माजी आ. धोंडे म्हणाले की,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत आहे.आपण आता शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणार आहोत. अशात प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकुन आणि हर घर तिरंगा या अभियानाला आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन माजी आ.
भीमराव धोंडे यांनी केले आहे.
हर घर तिरंगा’ स्वातंत्र्याचा उत्सव हे अभियान दि.१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आष्टी येथील संपर्क कार्यालयासमोर माजी आ.भीमराव धोंडे यांनी १४ आगस्ट रोजी ध्वजारोहण केले . याप्रसंगी त्यांनी नागरीकांशी संवाद साधला. ते म्हणाले, दि.१३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसांत राष्ट्रध्वजाचा संपूर्ण आदर राखत प्रत्येक घरावर तिरंगा दिमाखदारपणे फडकवावा यासाठी देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येकाने ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले यावेळी युवानेते अजयदादा धोंडे,ॲड. साहेबराव म्हस्के,
वाल्मिकतात्या निकाळजे,माजी जि.प. सदस्य सतीशमामा झगडे,अशोक साळवे,महेश बकेचे प्रा.शिवदास विधाते,त्रिदल संघटना पदाधिकारी,संजय मेहेर,विजय मेहेर,नविन कासवा,संजय शिंगवी, युनुसभाई शेख,सईदभाई चाऊस, नगरसेवक ज्ञानदेव राऊत, नगरसेवक आस्लम बेग,आस्ताक भाई शेख,डॉ. शैलजा गर्जे,अरुण सायकड, बाबासाहेब गर्जे,वसंत गिते,रेहान बेग,विकास वनवे,सागर वनवे, डॉ.ताबे,तोफिक बेग,शहानवाज पठाण,
बाबुराव कदम,ॲड. नवनाथ विधाते,विनोद निकाळजे, केदार जगताप, सनी काळपुंड,,दिपक पानसांडे, दत्ताभाऊ बोडखे,गणेश धोंडे,गणेश गायकवाड, आजिनाथ बेलेकर, रामेश्वर गोरे,आदेश निमोणकर,नवनाथ अनारसे,संदीप पगारे, खालेद शेख,आतीक शेख, सोमनाथ पवार, पत्रकार बांधव उपस्थित होते.