मुंबई प्रतिनिधी l आज मराठी वृत्तसेवा
भाजपा नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक विधानसभेत सरल ॲप डाऊनलोड करुन नोंदणी करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्व यशस्वीपणे कार्य करत आ.सुरेश धस यांनी नोंदणीस अधिक गती देऊन आष्टी मतदारसंघात अत्यंत प्रभावीपणे सरल ॲप नोंदणी केली आहे.या कौतुकास्पद कामगिरी दखल घेत प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार सुरेश धस यांनी मतदारसंघात राबविलेल्या कार्यप्रणाली ही कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे.
“सबका साथ सबका विकास” हे ब्रीद वाक्य सत्य अवतरल्या जात आहे. हाच विकास देशातील सर्वसामान्य नागरिकाला माहिती व्हावा म्हणून देश व्यापी महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत मोदी सरकारने हा कार्यक्रम हाती घेतला आहे.हे अभियान माझ्या मतदारसंघात प्रभावी राबविले असून या सर्व योजनांची माहिती सरल ॲपद्वारे केंद्र सरकारचा लाभ प्रत्येकापर्यंत देत आहे.तो तळागाळातील माणसं पर्यंत घरोघरी जाऊन आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या लोकांना सांगितला आहे. तसेच या सरल ॲपबाबतचे फायदे सर्वसामान्य पर्यंत सर्वसामान्यांना समजावून सांगत आज महाराष्ट्रात माझा मतदारसंघाचा सरल ॲप नोंदणीमध्ये १ नंबर स्थानावर आला असल्याने हे सर्व माझ्या कार्यकर्त्यांचे श्रेय असून याद्वारे तळागाळातील सर्वसामान्यपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचणार असल्याचे प्रतिपादन सरल ॲप नोंदणी प्रदेश प्रभारी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केले आहे.
मुंबई येथील भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात शुक्रवार दि.१८ ऑगस्ट रोजी सकाळी ठाणे – कोकण विभाग आणि सायंकाळी मुंबई विभागाच्या भाजपा जिल्हाध्यक्ष,विधानसभा निवडणुक प्रमुख तसेच पदाधिकारी यांची सरल ॲप नोंदणी बैठकीत ते बोलत होते..
भाजपाचे आ.सुरेश धस यांनी सरल ॲप नोंदणी प्रणाली मध्ये महाराष्ट्रात १ नंबरचे काम केल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरल ॲप नोंदणी प्रवास दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्याचे सरल ॲप नोंदणी प्रदेश प्रभारी म्हणून पक्षाने आमदार सुरेश धस यांची नियुक्ती केली आहे.या दौऱ्यात आ.धस यांनी त्यांच्या मतदारसंघात राबवलेल्या कार्यप्रणाली बाबत इतर मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.महाराष्ट्रभर दौऱ्याची सुरुवात मुंबई येथे प्रदेश कार्यालयात मुंबई-ठाणे-कोकण या विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संपन्न झाली.
यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी,
प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील,महामंत्री माधवीताई नाईक,प्रदेश मुख्यालय सह-प्रभारी सुमंत घैसास, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, यांच्यासह बैठकीस अपेक्षित श्रेणी विभागातील प्रदेश पदाधिकारी, विभाग संघटनमंत्री, जिल्हा अध्यक्ष, लोकसभा समन्वयक, प्रभारी, संयोजक, निवडणुक प्रमुख, विधानसभा निवडणुक प्रमुख, सोशल मीडीया व आय. टी.सेल पदाधिकारी उपस्थित होते.