आज मराठी वृत्तसेवा
राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी दिनांक 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यासह 3 हजार 80 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील मतदान होणार आहे यात आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीचा समावेश असून कोयाळ,रुईनालकोल सांगवी आष्टी,धिर्डी या चार गावांचा समावेश आहे
महाराष्ट्रातील एकूण 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची, 2 हजार 950 सदस्यपदा रिक्त जागांसाठी आणि 130 थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठीची निवडणूकीची घोषणा आज करण्यात आली. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी ह्या ठिकाणी आवश्यक असल्यास मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही घोषणा केली.
संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. 6 ऑक्टोबर रोजी तहसीलदार याची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. त्यानंतर दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. ह्यातील पात्र नामनिर्देशनपत्रांपैकी अर्ज मागे घेण्याचा कालावधी हा दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल आणि त्याच दिवशी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.यात कोयाळ, रुईनालकोल,सांगवी आष्टी,धिर्डी या चार गावांचा समावेश आहे