Read Time:1 Minute, 2 Second
आज मराठी वृत्तसेवा
सर्वत्र गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. राज्यातील बहुतांश भागांत दीड दिवसांच्या अन् पाच दिवसांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालं आहे. गुरूवारी अनंत चतुर्दशी असून सार्वजनिक गणरायाचे विसर्जन केलं जाणार आहे.
अशातच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली असून ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या मागणीला यश आल्याचे दिसते. खरं तर गुरूवारी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए- मिलाद हे सण एकाच दिवशी आल्याने महाराष्ट्र सरकारने शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. याबाबत राज्य सरकारने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे