आज मराठी l वृत्तसेवा
मूळ टाकळसिंग गाव येथील रहिवासी असलेले आणि सध्या आष्टी शहरात वास्तव्यास असलेले प्रसिद्ध प्लॉटिंग विक्रेते सुरेश बक्षी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री निधन झाले आहे
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील टाकळसिंग गावातील मूळ रहिवासी असलेले सुरेश बक्षी हे मागील अनेक वर्षापासून आष्टी येथे वास्तव्यास राहत आहेत सुरेश बक्षी यांनी आष्टी शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग विक्रेत्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपले नाव लवकिक केले होते शांत समय हसतमुख चेहरा असणारे सुरेश बक्षी यांना शुक्रवारी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यानंतर त्यांना अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांचे निधन झाले आहे अशी माहिती टाकळसिंग गावचे माजी सरपंच रामदास जगताप यांनी आज मराठीशी बोलताना दिली मृत्यू समयी त्यांचे 55 वर्षे वय होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे शनिवार दि.28 डिसेंबर रोजी दुपारी आष्टी येथील नगर-बीड रस्त्याला असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत