पोलीस निरीक्षक झाले रन आउट पत्रकारांनी तंगडी लावली बिल्डींग
सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावीचे शानदार अर्ध शतक
आज मराठी वृत्तसेवा
पोलिस प्रशासन अन् पत्रकारांचे मैत्रीपूर्ण सलोखा रहावा म्हणून आष्टी पोलीस प्रशासनाच्या वतीने आष्टी येथे रविवारी सकाळी सात वाजता पोलीस अन् पत्रकारांच्या क्रिकेट सामन्याचे खास आयोजन करण्यात आले होते अतिशय रंगतदार झालेल्या सामन्यांत पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस रन आउट झाले तर पत्रकारांनी जोरदार फिल्डिंग लावली होती या चुरशीच्या झालेल्या सामन्यात पोलिसांच्या संघाने पत्रकार संघाचा 53 धावांनी पराभव केला
आष्टी येथील नगर बीड रस्त्यालगत असलेल्या हंबर्डे महाविद्यालया जवळील छत्रपती शिवाजी महाराज तालुका क्रीडा संकुलन येथे रविवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते पोलिसांनी प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करत दहा षटकात 138 धावा ठोकल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावी
यांनी चौकार,षटकार ठोकत शानदार फलंदाजी करत अर्धे शतक केले,यावेळी पत्रकारांनी लावलेल्या बिल्डिंग मध्ये आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना रन आऊट केले तर पोलीस प्रशासनाच्या संघाकडून चाटे,बांगर, शिंदे,पवळ,गुंडाळे,क्षीरसागर,गोसावी,यांनी जोरदार शिवाजी करून पत्रकार संघासमोर 10 षटकात पाच बाद 138 धावाचे आव्हान उभा केले तर पत्रकार संघाकडून प्रवीण पोकळे, जावेद पठाण,दत्ता काकडे, पप्पू शिंदे यांना 30 धावात तंबूत परतावे लागले यावेळी अविशांत कुमकर, प्रफुल्ल सहस्रबुद्धे, दत्ता काकडे,उत्तम बोडखे, अविनाश कदम,गणेश दळवी, निसार शेख,भीमराव गुरव,बोडखे सर यांनी उत्कृष्ट खेळ करुन उपस्थितांचे मन जिंकले उर्वरित फलंदाजांना दहा षटकात 138 धावा पूर्ण करता आल्या नाहीत केवळ 85 धावावरच समाधान मानावे लागले 53 धावांनी पत्रकार संघाला पराभव पत्करावा लागला या सामन्याचे पंच म्हणून अशोक गोरे यांनी काम पाहिले अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात पार पडलेला क्रिकेट सामना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती