शिरूर l आज मराठी वृत्तसेवा
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्ह दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांनी शिरूर तालुक्यात आपला प्रचार दौरा केला आहे या दौऱ्यात लोकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पुन्हा एकदा येणाऱ्या पाच वर्षांसाठी सर्वसामान्य जनतेचा आधार असलेले बाळासाहेब आजबे हेच आमदार होणार असल्याच्या भावना लोक व्यक्त करत आहेत .
शिरूर तालुक्यात आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचार दौऱ्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे त्यांनी मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी शिरूर तालुक्यातील पिंपळनेर टेंभुर्णी घाटशील पारगाव भगवानगड तिंतरवणी निमगाव राळेसांगवी माळेगाव भावी यांचा आदी गावांचा प्रचार दौरा केला आहे शिरूर तालुक्यात आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत आपल्या प्रचार सभेदरम्यान घाटसाळवी येथील सभेत बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की आपल्याला गेली पाच वर्षात केवळ दोनच वर्ष काम करण्यासाठी मिळाले आहेत दोन वर्ष कोविडमध्ये व एक वर्ष विरोधात गेल्यामुळे दोन वर्षात आपल्याला जे शक्य होईल तेवढे विकास कामे आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विकास निधी खेतुन आणले आहे शिरूर तालुक्यामध्ये आपण सिंदफणा तलावाची उंची वाढवण्याचा प्रस्तावही दिला आहे त्याचबरोबर याच नदीवर लातूर टाईप बंधारे हे मंजूर करून आणली आहेत तर ठीक ठिकाणी साईट उपलब्ध असतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंधाऱ्याचे काम केले आहेत शिरूर तालुक्यासाठी शासकीय निवासस्थाने व शासकीय कार्यालयाच्या इमारती उभे करण्याचे काम आपण केले आहे आजपर्यंत कधी नवे एवढा विकास निधी आपण शिरूर साठी आणला आहे त्यामुळे या भागातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला मतदान करून निवडून द्यावे जेणेकरून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यासाठी काम करेन असा विश्वास यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिला तर विरोधकांकडून फक्त पोकळ घोषणा केल्या जात आहेत पंधरा वर्षे सत्तेत असताना हे विकासकामे दिसले नाही का असा सवाल करत आता विकासाच्या गप्पा मारून जनता विरोधकांच्या भूल थापणा बळी पडणार नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवेल आपण विकास कामे काय असतात हे जनतेला माहिती करून दिले प्रत्येक गाव वाडी वस्तीवर विकास कामे करून आपण जनतेचा विश्वास संपादन केला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा मला संधी द्यावी अशी विनंती यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.