मुंबई l आज मराठी
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना काढण्यात आली आहे
आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३४१ड आणि कलम ३ च्या पोट-कलम (२), (२A ) आणि (३) अन्वये तसेच
इतर सर्व प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त संक्रमणात्मक क्षेत्र हे अधिक लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करीत असून,त्याकरिता केज नगरपरिषद या नावाने एक नगरपरिषद घटित करीत आहे.उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची “ब” मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने,शासनाच्या उप सचिव.विद्या हम्पय्या यांनी परिपत्रक काढले आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात एकमेव नगरपंचायतीची आता ही नगरपरिषद होत आहे यासाठी केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी पाठपुरावा केला आहे
बीड,परळी,अंबाजोगाई,माजलगाव,गेवराई आणि आता केज अशा सातही तालुक्यात नगर परिषद झालेल्या आहेत तर आष्टी पाटोदा शिरूर आणि वडवणी या चारच तालुक्यात नगरपंचायती आहेत त्यामुळे या चार तालुक्याच्या ठिकाणी नगर परिषद कधी होणार अशी चर्चा नागरिकांत होत आहे