आष्टी प्रतिनिधी l आज मराठी वृत्तसेवा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आयोजित आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा 2023 दि. 07.11.2023 ते 8. 11.2023 या कालावधीत वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय, नेहरूनगर ता. कंधार जि. नांदेड येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये आठ जिल्ह्यांमधून एकूण 16 संघ सहभागी झाले होते, या स्पर्धेमध्ये आनंद शैक्षणिक संस्था संचलित अन्नतंत्र महाविद्यालय, आष्टी या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक पटकावले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मा. भीमरावजी धोंडे साहेब, संचालक डॉ.अजयदादा धोंडे,प्रशासन अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, प्रा.एस.जी.विधाते यांनी संपूर्ण संघ व क्रीडाशिक्षक यांनी अभिनंदन केले.
या वेळी उपस्थित कृषी महाविद्यालय आष्टी चे प्राचार्य डॉ. आरसूळ एस. आर., अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. मोहळकर एस. एस.,कृषी पदविका विद्यालयाचे प्राचार्य श्री उद्धव घुले यांनी विद्यार्थ्यांचे सुवर्णपदक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच संघाचे प्रशिक्षक डॉ. बी. बी. खेमगर ,क्रीडाशिक्षक प्रा.तीमेवार व्ही. आर. यांचेही अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.